मुंबई

म्हाडा मुंबई मंडळाची बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाई तीव्र

CD

बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई तीव्र
म्हाडा मुंबई मंडळाकडून गोरेगाव येथील विकसकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत गोरेगाव येथील सुभाषनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या वरील तीन मजल्यांवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई मंडळाच्या कार्यक्षेत्रातील म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गोरेगाव येथील सुभाषनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या तळमजला अधिक २२ मजली इमारतीमध्ये म्हाडा मुंबई मंडळाची आवश्यक परवानगी न घेता वरील तीन मजल्यांवर एकूण १२ सदनिकांचे बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी संबंधित विकसक विकास अरविंद सुरती यांच्या विरुद्ध कायद्यानुसार नोटीस बजावणे, सुनावणी घेणे आणि आदेश पारित करणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर २८, २९ आणि ३० सप्टेंबरला सदर बेकायदा बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. या निष्कासन कारवाईसाठी झालेला खर्चही संबंधित विकसकाने मुंबई मंडळाला अदा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. बेकायदा बांधकामाचे स्वरूप, त्याची व्याप्ती आणि प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेऊन संबंधित विकसकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील लागू तरतुदींनुसार गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणांची तपासणी
म्हाडा मुंबई मंडळाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत आगामी काळात मुंबईतील विविध परिसरांमध्ये बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये गोरेगावमधील सिद्धार्थनगर, मोतीलालनगर, वाकोला येथील आनंदनगर, विक्रोळीतील टागोरनगर, अंधेरीतील एस. व्ही. पी. नगर तसेच बोरिवली कार्यक्षेत्रातील गोराई आणि चारकोप या परिसरांचा समावेश आहे. या परिसरांमध्ये वारंवार बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रकरणांची तपासणी करून, उपलब्ध वस्तुस्थिती आणि लागू कायदेशीर तरतुदींच्या आधारे पात्र प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT