मुंबई

जंगल सफारीसाठी रेल्वेची खास पर्यटन सफर!

CD

रेल्वेची खास पर्यटन सफर!
ताडोबा, पेंचसह पाच सहलींचे नियोजन; १९ नोव्हेंबरपासून पहिली फेरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : जंगलातील वाघांसह विविध वन्यजीवांचे दर्शन घेण्याची संधी आता रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने ‘वनदर्शन’ पर्यटन उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ताडोबा, पेंचसह राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्यांना भेट देण्यासाठी पाच सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सहल १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
या उपक्रमात ताडोबा-बोर, ताडोबा-नवेगाव नागझिरा, पेंच-उमरेड पवनी कऱ्हांडला, ताडोबा-उमरेड पवनी कऱ्हांडला आणि ताडोबा-टिपेश्वर अशा पाच सहलींचा समावेश आहे. या माध्यमातून पर्यटकांना वेगवेगळ्या जंगलांतील जैवविविधता आणि वन्यजीवांचा अनुभव घेता येणार आहे.

तिकीट, निवास आणि सफारी एकाच पॅकेजमध्ये
प्रत्येक सहल चार रात्री आणि पाच दिवसांची असेल. रेल्वे प्रवास, निवास, स्थानिक वाहतूक आणि जंगल सफारीच्या परवान्याची व्यवस्था पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रवासापासून सफारीपर्यंतचे नियोजन एकाच ठिकाणी करता येईल.

प्रत्येक फेरीत १२ बर्थ
सहलीसाठी तृतीय वातानुकूलित श्रेणीतील सहा आणि द्वितीय वातानुकूलित श्रेणीतील सहा, असे एकूण १२ बर्थ उपलब्ध असतील. त्यामुळे प्रत्येक फेरीत मर्यादित पर्यटकांनाच सहभागी होता येणार आहे.

ऑनलाइन आरक्षणाची सुविधा
‘वनदर्शन’ सहलींचे आरक्षण आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावर करता येणार आहे. पॅकेजचे दर, उपलब्धता आणि इतर अटींची माहितीही तेथे मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT