मुंबई

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी अन् समुद्राचा विनाश! मनोरी क्षारनिरास प्रकल्प रद्द करा

CD

पैशांची उधळपट्टी अन् समुद्राचा विनाश!
मनोरी क्षारनिरास प्रकल्प रद्द करा; मच्छीमार संघटनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : मुंबईकरांच्या करांमधून गोळा होणाऱ्या पैशांची उधळपट्टी करणारा आणि सागरी परिसंस्थेसह मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर गदा आणणारा मनोरी क्षारनिरास प्रकल्प हा जनतेच्या माथी मारलेला ‘सफेद हत्ती’ आहे. हा विनाशकारी प्रकल्प तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीसह सर्व मच्छीमार संघटनांतर्फे १९ ऑक्टोबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.

​माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे पुढे आणलेला हा प्रकल्प आता महायुती सरकार पूर्णत्वास नेत असल्याने मच्छीमार समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.‘‘सत्ताधारी बदलले, मात्र जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि मच्छीमारांच्या अस्तित्वाशी खेळण्याचे धोरण कायम राहिले,’’ अशी टीका समितीने केली आहे.
​​प्रकल्पाच्या सविस्तर अहवालानुसार, दररोज ५०० (दशलक्ष लिटर) समुद्राचे पाणी उपसून त्यातून २०० एमएलडी पिण्यायोग्य पाणी तयार केले जाईल, मात्र या प्रक्रियेनंतर उरणारे सुमारे ३०० एमएलडी अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाईल. या रासायनिक विसर्गामुळे सागरी पर्यावरण आणि मत्स्य संपत्ती नष्ट होण्याची गंभीर भीती व्यक्त केली जात आहे. ​या प्रकल्पाचा प्राथमिक खर्च ३,४६२ कोटी असून वार्षिक वीजखर्च १४७ कोटी येणार आहे. इतर परिचालन खर्च लक्षात घेता, हा प्रकल्प मुंबईकरांवर हजारो कोटींचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणारा ठरेल, असे समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी स्पष्ट केले.
​समुद्राचे पाणी महागड्या प्रक्रियेद्वारे गोडे करण्याऐवजी मुंबईतील पाण्याची मोठी गळती रोखण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवावी, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. डीपीआरमधील आकडेवारीनुसार, मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत तब्बल ३८ टक्के (सुमारे १,४४५ एमएलडी पाणी वाया जाते. ही गळती १५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास दररोज सुमारे ८७५ एमएलडी पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे कोट्यवधी रुपये उधळून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा अट्टहास कशासाठी? असा थेट सवाल मच्छीमार संघटनांनी केला आहे. ​ऊर्जेचा प्रचंड वापर करणारे रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञान, वाढता देखभाल खर्च आणि सागरी पर्यावरणाची हानी यांचा कोणताही विचार न करता हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT