मुंबई

पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच

CD

पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी
सकाळ वृत्तस्ववा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांना भविष्यात पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्य सरकारने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील जलसाठ्यावर शहराची मोठी भिस्त आहे, मात्र भविष्यात पाण्याची मागणी वाढणार असल्याने केवळ उपलब्ध तलावांवर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. २०४१ पर्यंत मुंबईच्या पाण्याची गरज सध्याच्या तुलनेत सुमारे ५७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या जलस्रोतांचा विकास आणि पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण यांना प्राधान्य देणे आवश्यक पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

गारगाई धरण प्रकल्प, समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचा प्रकल्प, तसेच मुंबईतील पारंपरिक विहिरींचे पुनरुज्जीवन यांसारख्या पर्यायांचा नियोजनबद्ध पद्धतीने विचार करावा. त्याचबरोबर जलवाहिन्यांमधील पाणीगळती रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवणे यावरही भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

Shirur Gun Firing : चोरट्यांनी सोसायटीत चोरीच्या उद्देशाने घरात घुसून केला गोळीबार; पायाला गोळी लागल्याने मेडिकल व्यावसायिक जखमी

SCROLL FOR NEXT