मुंबई

तीन महिन्यांत १३,८५७ तक्रारी; ११,४९१ अर्ज सुरुवातीलाच फेटाळले

CD

तीन महिन्यांत १३,८५७ तक्रारी
एफडीएच्या पोर्टलवरील ७१.८ टक्के तक्रारींचे निवारण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर तीन महिन्यांत १३ हजार ८५७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ७१.८ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या आयुक्तांनी दिली आहे, मात्र तक्रार दाखल करण्याच्या प्राथमिक टप्प्यावरच ११ हजार ४९१ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, अधिकार क्षेत्राबाहेरील तक्रारी, अपुरी माहिती आणि ठोस आधार नसलेले दावे यांचा फेटाळण्यात आलेल्या अर्जांमध्ये समावेश आहे. तक्रारींची सत्यता तपासण्यासाठी पोर्टलवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा आणि निर्धारित नियमांचा वापर केला जात आहे. अन्नपदार्थांशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी एफडीएने १४ जुलैला complaints.mahaonline.gov.in हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तक्रारींचे ठरावीक वेळेत पारदर्शक पद्धतीने निवारण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे आपोआप पाठविल्या जातात. निर्धारित वेळेत कारवाई न झाल्यास त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जातात. आतापर्यंत अशा प्रकारे चार हजार ६८ तक्रारी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच, वेळेत कारवाई न झाल्याने यंत्रणेमार्फत ४६८ नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत.

दुकाने आणि सुपरमार्केट लक्ष्य
एफडीएच्या आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात हॉटेल आणि उपाहारगृहांशी संबंधित तक्रारींचे प्रमाण अधिक होते, मात्र आता मोठी दुकाने, सुपरमार्केट, जलद ऑनलाइन वितरण सेवा आणि ग्राहकांना थेट दिसत नसलेल्या मालसाठा केंद्रांशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. एकूण तक्रारींपैकी सुमारे ५० टक्के तक्रारी या संबंधित आस्थापनांविषयी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT