मुंबई

वाढत्या खर्चामुळे हॉटेलचे खाणे महागणार

CD

हॉटेलचे खाणे महागणार!
खाद्यपदार्थांच्या भावात १०-१५ टक्क्यांची वाढ होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाणे आता आणखी महागणार आहे. व्यावसायिक गॅस, खाद्यपदार्थ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांसह भाडे, मनुष्यबळ आणि वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी पुढील आठवड्यात खाद्यपदार्थांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) शुक्रवारी ही माहिती दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी काही काळापासून वाढत्या खर्चाचा भार स्वतः सोसला आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी आणि पाइप गॅसच्या दरांतील वाढीमुळे स्वयंपाकाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, डाळी, कांदा, खाद्यतेल, किराणा माल आणि इतर कच्च्या मालाच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम होत असल्याचे ‘आहार’ने म्हटले आहे.
मुंबईतील व्यावसायिक जागांचे वाढते भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर सुविधा, इंधन व वाहतूक खर्च यांचाही हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. देखभाल-दुरुस्ती, उपकरणे, वीज-पाणी, तंत्रज्ञान, पॅकेजिंग आणि विविध नियमांच्या पूर्ततेसाठी होणाऱ्या खर्चातही वाढ झाल्याचे संघटनेने नमूद केले. प्रत्येक रेस्टॉरंट आपल्या खर्चाची रचना आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार दरवाढीचा निर्णय स्वतंत्रपणे घेणार आहे. ही वाढ डायन-इनसह क्विक सर्व्हिस आणि फूड डिलिव्हरी सेवांमध्येही लागू होऊ शकते.
==
खाद्यपदार्थ, भाडे, मनुष्यबळ आणि वाहतूक या सर्वांचा खर्च एकाच वेळी वाढत असल्याने संपूर्ण भार सोसणे आता शक्य नाही. व्यवसाय टिकवण्यासाठी खाद्य पदार्थच्या किमतीत १० ते १५ टक्के सुधारणा आवश्यक झाली आहे.
- विजय के. शेट्टी, अध्यक्ष आहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT