मुंबई

एसआयआरविरोधात मुंबईत ‘लहरादो तिरंगा’ आंदोलन; मतपत्रिकेद्वारे निवडणुकांची मागणी

CD

आझाद मैदानात ‘लहरा दो तिरंगा’
मतपत्रिकेद्वारे निवडणुकांची आंदोलकांची मागणी
मुंबई, ता. १६ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला विरोध, कथित मतचोरीच्या आरोपांची चौकशी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी आझाद मैदानात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीचे रोहन पालकर यांच्यासह सुमारे ९० ते १०० महिला-पुरुष सहभागी झाले होते.
सीजेपी, नवजवान भारत सभा, दिशा छात्र संघटना, भगतसिंह जनअधिकारी यात्रा आणि ‘हम भारत के लोग’ यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा हातात घेऊन लोकशाही, संविधान, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आवाज उठवला. एसआयआर रद्द करणे, ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा आणि निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सीजेपीचे जय भोसले यांनी सरकारला प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचारांविरोधात कठोर कायदे आणि प्रभावी कारवाईची गरज अधोरेखित करीत त्यांनी सरकारच्या कामकाजावरही टीका केली. कॉम्रेड बबन ठोके यांनी देशभरात सुमारे १३ कोटी, तर महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळल्याचा दावा केला.
घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनात विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘ज्ञानेश कुमार इस्तीफा दो’, ‘वोट चोर गद्दी छोड़’ आणि ‘लडेंगे, जीतेंगे’ अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गीतही सादर करण्यात आले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT