मुंबई

देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात अभाविपने केले मुंबई विद्यापीठात आंदोलन

CD

अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन
मुंबई , ता. १६ : देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने शुक्रवारी (ता. १६) मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वाक्षरी अभियान आणि शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. ‘अराजकता रोखा-लोकशाही वाचवा!’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
देशभरामध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर संघटनांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात अभाविपने हे आंदोलन केले. जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर संघटनेकडून जोरदार टीका करण्यात आली. देशात सुरू असलेले हे आंदोलने बांगलादेशसदृश अराजकतेला भारतात थारा देत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या आंदोलनाच्या माध्यमातून
सध्या देशात काही प्रवृत्तींमार्फत जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून, त्यांना मिळणारे संभाव्य परदेशी पाठबळ चिंताजनक असल्याचा आरोप अभाविपने केला. भारतविरोधी शक्ती विविध संघटनांच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही आयोजकांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित, लोकशाही मूल्ये आणि देशाची एकात्मता अबाधित राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे अभाविपने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT