मुंबई

फोर्टिस रुग्णालयाच्या उपाहारगृहात झुरळे

CD

‘साेफिया,’ ‘फोर्टिस’ला दणका

‘एफडीए’ची कारवाई; सात खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रुग्णालये, महाविद्यालये आणि बेकऱ्यांमधील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाच्या उपाहारगृहात झुरळे, अन्नाच्या डब्यांना बुरशी आणि गंजलेली सुरी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली. भुलाभाई देसाई मार्गावरील सोफिया महाविद्यालयाच्या उपाहारगृहासह मुंबईतील सात खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यभरातही धडक मोहीम राबवून सुमारे एक कोटी ७३ लाख रुपयांचा ८१ हजार किलोहून अधिक माल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील खाद्य आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीत रुग्णांसाठी अन्न तयार करण्यात येत असलेल्या फोर्टिस रुग्णालयाच्या उपाहारगृहात स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याने हे उपाहारगृह चालवणाऱ्या सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, अन्नसुरक्षा आणि मानके (परवाना व नोंदणी) विनियम, २०११ मधील अनुसूची चारमध्ये नमूद केलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली. जोगेश्वरी पूर्व येथील जनता बेकरीतही स्वच्छतेची चिंताजनक परिस्थिती आढळली. तपासणीदरम्यान या बेकरीला ८८ पैकी केवळ २८ गुण मिळाले. म्हणजेच बेकरीची कामगिरी सुमारे ३२ टक्के इतकी होती.

व्यवसाय बंद करण्याची नोटीस
बोरिवली पूर्व येथील मनमंदिर स्वीट्समध्येही अनियमितता आढळल्या. नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्त्याच्या ठिकाणी मिठाईची निर्मिती न करता अन्य ठिकाणी केली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच परिसरात माश्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव, अस्वच्छ भांडी आणि कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव अशा त्रुटी आढळल्या. मिठाई तयार करण्याच्या ठिकाणीच कर्मचारी राहत असल्याची बाबही समोर आली. अन्न व औषध प्रशासनाने या आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT