मुंबई

टीसी आणि महिलेत झटापट; महिलेचे कपडे फाटले कांदिवली स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान गोंधळ; रेल्वे पोलिसांचा हस्तक्षेप

CD

टीसी आणि महिलेत झटापट; महिलेचे कपडे फाटले
कांदिवली स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान गोंधळ; रेल्वे पोलिसांचा हस्तक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेला रोखण्याच्या प्रयत्नात महिला मुख्य तिकीट निरीक्षक फलाटावर पडल्या. या गोंधळादरम्यान संबंधित महिलेचे कपडे अंशतः फाटल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. शुक्रवारी सायंकाळी कांदिवली स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाला हस्तक्षेप करावा लागला.
कांदिवली स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्य तिकीट निरीक्षक प्रिया अंबावडे तिकीट तपासणी करत होत्या. त्या वेळी २५ वर्षांच्या एका महिलेकडे वैध तिकीट नसल्याचे आढळले. दंडात्मक कारवाई न करता सोडून देण्याची विनंती तिने केली, मात्र रेल्वेच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. याचदरम्यान आणखी एका विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेने दंड भरला.

रोखण्याच्या प्रयत्नात टीसी फलाटावर
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या महिलेने कारवाई टाळण्यासाठी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. तिला रोखताना अंबावडे यांचा तोल गेला आणि त्या फलाटावर पडल्या. या गोंधळादरम्यान संबंधित महिलेचे कपडे अंशतः फाटल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.

कार्यालयाबाहेर जमाव
घटनेनंतर संबंधित महिलेला तिकीट तपासणी कार्यालयात आणण्यात आले, मात्र तिच्यासोबत असलेल्या तीन ते चार महिलांनी हस्तक्षेप करून तिला रेल्वे परिसरातून बाहेर नेल्याची माहिती रेल्वेने दिली. त्यानंतर पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीने तिकीट निरीक्षकाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काही वेळाने तिकीट तपासणी कार्यालयाबाहेर जमाव जमला. तिकीट निरीक्षकाने अयोग्य भाषा वापरल्याचा आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप काही जणांनी केला. त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले.

पोलिसांचा हस्तक्षेप
स्थानकातील परिस्थिती लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांना नियमानुसार कर्तव्य बजावताना अडथळे किंवा धमक्यांना सामोरे जावे लागू नये, अशी भूमिका पश्चिम रेल्वेने मांडली. कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत तक्रार असल्यास त्याची योग्य प्रक्रियेद्वारे चौकशी होणे आवश्यक असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT