पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्पासाठी
अनेक रहिवाशांकडून घरे रिकामी
उर्वरित ६५ सदनिका रिकाम्या करण्यासाठी म्हाडा पोलिसांची मदत घेणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीचा म्हाडा स्वतः पुनर्विकास करणार असून त्याला आता वेग येणार आहे. येथे असलेल्या १७ इमारतींमध्ये एकूण ९८४ सदनिका आणि दुकाने आहेत. त्यापैकी आतापर्यंत जवळपास ९०० हून अधिक रहिवाशांनी आपली घरे रिकामी केली आहेत. आता केवळ ६५ सदनिका रिकाम्या करणे बाकी असून, त्यामध्ये १० ते १२ दुकानांचाही समावेश आहे. ही घरे रिकामी करण्यासाठी म्हाडाकडून २९ ऑक्टोबरला बळाचा वापर केला जाण्याची शक्यता असून, रहिवाशांना चांदीवली येथील संक्रमण शिबिरात हलवले जाणार आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.
म्हाडाकडून आतापर्यंत या वसाहतीतील चार इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून, आणखी दोन इमारतींचे पाडकाम सध्या सुरू आहे. नोव्हेंबर २०२५ पासून रहिवाशांना घरे रिकामी करण्याबाबत विनंती केली जात होती, तर संक्रमण शिबिर एप्रिल-मे २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र रहिवाशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने इमारती रिकाम्या करण्यास वेळ लागत असल्याचे म्हाडाच्या संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत सदनिका रिकाम्या केलेल्या ९०० रहिवाशांपैकी १५ कुटुंबांनी संक्रमण सदनिका स्वीकारल्या आहेत, तर उर्वरित रहिवाशांनी भाड्याचा पर्याय स्वीकारला आहे.
पीएमजीपी वसाहत ही मुंबईतील सर्वात जुन्या वसाहतींपैकी एक असून, इमारती धोकादायक झाल्याने पुनर्विकास आवश्यक होता. म्हाडाच्या या प्रकल्पांतर्गत रहिवाशांना नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये कायमस्वरूपी घरे दिली जाणार आहेत. मात्र काही रहिवाशांनी संक्रमण शिबिरात जाण्यास टाळाटाळ केल्याने प्रकल्पाला विलंब होत होत असल्याचे म्हाडाचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.