मुंबई

सायबर सुरक्षेसाठी मध्य रेल्वेची जनजागृती

CD

सायबर सुरक्षेसाठी मध्य रेल्वेची जनजागृती
सतर्कता जागरूकता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : सायबर धोके टाळण्यासाठी सुरक्षित डिजिटल पद्धतींचा अवलंब करण्यासह अधिकृत माहितीचे संरक्षण करण्याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. ‘सतर्कता जागरूकता सप्ताह-२०२६’च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या दक्षता विभागातर्फे १२ ऑक्टोबरला ‘सायबर सुरक्षा आणि सायबर स्वच्छता’ या विषयावर ऑनलाइन जनजागृती सत्र पार पडले.
मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील परिषद सभागृहातून हे सत्र झाले. मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला. मध्य रेल्वे मुख्यालयातील माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या पथकाने सादरीकरणाद्वारे सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

माहितीच्या संरक्षणावर भर
अधिकृत माहिती सुरक्षित ठेवणे, डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करणे आणि संभाव्य सायबर धोके ओळखून त्यांना प्रतिबंध करणे, याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कार्यालयीन कामकाजासह दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल संसाधनांचा सुरक्षित वापर करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

सतर्कता सप्ताहाचे औचित्य
२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान ‘सतर्कता जागरूकता सप्ताह-२०२६’ साजरा करण्यात येणार आहे. ‘सतर्कतेतून समृद्धी’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या माध्यमातून सचोटी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मूल्ये जपण्यासह डिजिटल व्यवहारांमध्ये सतर्कता वाढवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सायबर स्वच्छतेची सवय रुजवून संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करण्यावर रेल्वेने भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT