मुंबई

महिला टीसीला धक्काबुक्कीप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांत गुन्हा

CD

महिला टीसीला धक्काबुक्कीप्रकरणी गुन्हा
कांदिवली स्थानकातील घटना; मुदत संपलेल्या पासवरून वाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कांदिवली रेल्वे स्थानकात महिला मुख्य तिकीट निरीक्षकाला धक्काबुक्की, शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून बोरिवली रेल्वे पोलिसांनी एका महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुदत संपलेल्या पासवरून दंड भरण्यास सांगितल्यानंतर हा वाद झाल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आंबवडे (वय ४९) या पश्चिम रेल्वेत मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १६ ऑक्टोबरला कांदिवली स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील तिकीट तपासणी कार्यालयाजवळ त्यांनी एका महिला प्रवाशाला तपासणीसाठी थांबवले. संबंधित महिलेने मुदत संपलेला पास दाखवला. त्यानंतर ५१० रुपये दंड भरण्यास सांगितल्यावर तिने नकार देत वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

धक्काबुक्की आणि धमकीचा आरोप
दंड न भरता निघून जाण्याच्या प्रयत्नात संबंधित महिलेने आंबवडे यांच्याशी झटापट केली. यात त्यांच्या हाताला झटका लागल्याने त्या कार्यालयात पडल्या तसेच गणवेशाचा खांद्याजवळील भाग फाटल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आंबवडे यांनी महिलेला पकडून कार्यालयात आणले. काही वेळाने तेथे आलेल्या एका महिला आणि पुरुषाने संबंधित प्रवाशाला सोबत नेले. यानंतर जमावातील एका महिलेने आंबवडे यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

FDA Action : मुदतबाह्य, खराब अन्नपदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट संशयास्पद; रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटला ‘एफडीए’चा दणका

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT