मुंबई

घाटकोपरच्या गारोडिया नगरातील ५ रस्त्यांचे नूतनीकरण होणार; महापालिकेचा ४.३६ कोटींचा खर्च

CD

घाटकोपरच्या गारोडिया नगरातील
पाच रस्त्यांचे नूतनीकरण होणार
महापालिकेचा ४.३६ कोटींचा खर्च
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व येथील गारोडिया नगर परिसरातील खड्डेमय पाच प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम अखेर महापालिकेने हाती घेतले आहे. मास्टिक डांबराचा वापर करून या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत मेसर्स ए. के. कॉर्पोरेशन या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार कोटी ३६ लाख ७५ हजार ७५५ रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
​गारोडिया नगर हा खासगी लेआउट असला तरी महापालिकेने २०१५मध्ये या परिसरातील नऊ रस्त्यांना सार्वजनिक रस्ते म्हणून घोषित केले होते. त्यानंतर पालिकेकडून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या रस्त्यांचा तीन वर्षांचा दोष दायित्व कालावधी मार्च २०२४ मध्येच संपुष्टात आला. सध्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था झाली असून, वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार पराग शाह यांनी पालिका प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी लावून धरली होती.

कामाचा दर्जा टिकवण्यासाठी कठोर अट
पालिकेच्या एन विभागाने गारोडिया नगरातील युनियन बँक लेन, पुष्पा हॉटेलसमोरील नीलकंठ कुंज ते नीलकंठ टॉवर लेन, नीलकंठ टॉवर ते कुकरेजा टॉवर लेन, नीलकंठ टॉवर ते गुरू दर्शन बिल्डिंग लेन आणि गोवर्धन धाम ते गारोडिया नगर शाळा लेन या पाच प्रमुख रस्त्यांचे मास्टिक पुनर्पृष्ठीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचा दर्जा टिकवण्यासाठी महापालिकेने कठोर अट घातली आहे. काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराला ८० टक्के रक्कमच दिली जाईल, तर उर्वरित २० टक्के रक्कम दोन वर्षांचा दोष दायित्व कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाईल.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT