मुंबई

घर भाड्याने देण्यासाठी रेंटल हाऊसिंग पोर्टल दिवाळीत सुरू होणार

CD

रेंटल हाउसिंग पोर्टल दिवाळीत
अंमलबजावणीसाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सर्वसामान्यांना राज्यभरात भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार म्हाडाच्या माध्यमातून तयार करत असलेले रेंटल हाउसिंग पोर्टल दिवाळीत सुरू होणार आहे. या पोर्टलची निर्मिती, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण विभागाकडून म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार असून, येत्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईसह एमएमआरमध्ये ग्रोथ हब उभारले जाणार असल्याने भविष्यात भाड्याच्या घरांना मोठी मागणी असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून रेंटल हाउसिंग पॉलिसी तयार केली असून, ती मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याचाच एक भाग म्हणून म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. या पोर्टलसाठी म्हाडाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीला कंत्राट दिले आहे. या पोर्टलमुळे घर भाड्याने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. कोणतीही दलाली न देता केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिकांना घरे मिळणार आहेत.

कायदेशीर संरक्षण मिळणार
भाडेकरारनामा, पोलिस व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधाही याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. यासाठी म्हाडाला नोंदणी व मुद्रांक विभाग, पोलिस आणि महापालिकेशी समन्वय साधावा लागणार आहे. या पोर्टलद्वारे व्यवहार केल्यास कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी ई-कोर्टची सुविधा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT