मुंबई

आमिर खान-राज ठाकरे भेट

CD

आमिर खान-राज ठाकरे भेट

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १८ : अभिनेता आमिर खान याने रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या भेटीमागे आमिरचा भाचा इम्रान खान याच्यावरील कायदेशीर कारवाईची पार्श्वभूमी असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात होते. मनसेच्या पदाधिकाऱ्याने हे फेटाळले असून, या भेटीचा इम्रान खान प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्यांचे जुने व जवळचे संबंध असून, त्यांच्या नियमित भेटी होत असतात, असेही त्याने स्पष्ट केले.
​इम्रान खान हा अमेरिकेत जन्मलेला असून, त्याच्याकडे ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (ओसीआय) कार्ड आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (एसआयआर) कथित अनियमिततेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित एका आंदोलनात तो सहभागी झाला होता. या सहभागामुळे मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. ​पोलिसांच्या या नोटीसीला आव्हान देण्यासाठी इम्रानने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या भेटीदरम्यान दोघेही ‘शिवतीर्थ’च्या बाल्कनीत मनमोकळ्या गप्पा मारतानाच्या छायाचित्रांनी सोशल मीडियावर व्‍हायरल झाले.


.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

Devendra Fadnavis: पक्षांतर्गत सत्ताबदलात अपयश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना टोला

SCROLL FOR NEXT