मुंबई

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

CD

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

जुहू येथील घटना; चालकासह पादचारी जखमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर रविवारी (ता. १८) सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या अनाेळखी आरोपींनी गोळीबार केल्याची घटना जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात घडली. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुखरूप बचावला असून, त्याचा वाहनचालक आणि एक पादचारी जखमी झाला आहे. टायगरचा चालक फिरदाेस आणि उमेश चरण (वय ३५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर अनुक्रमे कूपर आणि नानावटी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

जुहू येथे वैयक्तिक कामासाठी टायगर आला होता. तेथून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या अनाेळखी तीन व्‍यक्तींनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला आणि ते पळून गेले. जुहूमध्ये जमुनाबाई नर्सरी स्कूलच्या प्लेग्राउंडजवळ रस्त्यावर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत टायगरला गोळी लागलेली नाही. त्याच्या गाडीचा चालक फिरदाेस याच्या डाव्‍या हाताला गाेळी लागली आहे. त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. जखमी रिक्षाचालक उमेश चरण याच्या उजव्‍या बाजूला छातीत गाेळी लागली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. पाेलिसांनी हल्लेखाेरांचा शाेध घेण्यासाठी व्‍यापकी माेहीम हाती घेतली आहे. आराेपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथकाकडून हल्ला झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्‍ही फुटेज तपासले जात असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी
समाज माध्यमांवरची पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोई टाेळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमान खानसोबत काम करणाऱ्या किंवा मुंबईतील चित्रपटसृष्टीत टोळीचे म्हणणे न ऐकणाऱ्यांना पुढील लक्ष्य केले जाईल, अशी धमकीही अनिल पंडित नामक व्‍यक्तीने या पोस्टद्वारे टायगरला धमकी दिली. टायगरला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याने ऐकले नाही, असा दावा केला आहे. या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच तातडीने तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तपासासाठी १५ पथके तैनात
गाेळीबाराच्या तपासासाठी १५ पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संशयित दाव्याच्या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. पोलिसांकडून न्यायवैद्यक पथकाकडून महत्त्वाचे पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिस उपायुक्त (डीसीपी) मोहित कुमार गर्ग यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
.............
अभिनेत्यांवर आतापर्यंतचे गोळीबार
एप्रिल २०२४ : वांद्रेस्थित गॅलेक्सी अपार्टमेंट या सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर दोन अनाेळखी मोटारसायकलवर येऊन पाच राउंड फैरी झाडल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई टाेळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

फेब्रुवारी २०२६ : जुहू येथे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर अनाेळखींचा गोळीबार. या प्रकरणातही पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना आणि शूटर्सना अटक.

जानेवारी २०२६ : ओशिवरा येथे गोळीबार प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून अभिनेता व समीक्षक कमाल आर. खानला पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

Devendra Fadnavis: पक्षांतर्गत सत्ताबदलात अपयश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना टोला

SCROLL FOR NEXT