जखमी उमेश चौहान यांच्यावर
‘केईएम’मध्ये उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अभिनेता टायगर श्राॅफ याच्यावर झालेल्या हल्ल्यादरम्यान गोळी लागून जखमी झालेले उमेश चौहान यांची प्रकृती स्थिर आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या हृदयाला किंवा फुप्फुसांना इजा झालेली नाही. सध्या त्यांना आपत्कालीन अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाने सोमवारी (ता. १९) सकाळी जारी केलेल्या वैद्यकीय माहितीत ही बाब स्पष्ट केली आहे.
उमेश चौहान यांना १८ ऑक्टोबर रोजी गोळी लागून दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना सुरुवातीला जुहू येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासणी आणि तज्ज्ञ उपचारांसाठी १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.
केईएम रुग्णालयातील सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभागाच्या आपत्कालीन अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदय व छातीच्या शस्त्रक्रियेसंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, औषधोपचार सुरू आहेत. पुढील उपचारांची दिशा ठरविण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रतिमांकन चाचण्या आणि तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. या तपासण्यांचे निष्कर्ष तसेच रुग्णाच्या प्रकृतीतील बदल लक्षात घेऊन पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.