मुंबई

महापालिकेच्या १४ हजार कर्मचाऱ्यांचे कामकाज होणार डिजिटल!

CD

महापालिकेच्या १४ हजार कर्मचाऱ्यांचे कामकाज होणार डिजिटल!
ई-ऑफिस प्रणालीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी; कागदी फाइल्सना लवकरच पर्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये टप्प्याटप्प्याने सुमारे १४ हजार वापरकर्त्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे कार्यालयीन फाइल्स, पत्रव्यवहार, प्रस्ताव आणि मंजुरीची प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण करता येणार असून, कागदाचा वापर कमी होण्यासह प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घेणेही सोपे होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
महापालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी (ता. १७) वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये झाली. या बैठकीत ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या या प्रणालीद्वारे कार्यालयीन कामकाज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. सध्या कागदी फाईल्सच्या माध्यमातून होणारी टिप्पणी, प्रस्ताव तयार करणे, मंजुरी घेणे आणि आदेश जारी करणे या प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडता येतील. त्यामुळे फाइल एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठविण्यास लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल.
ई-ऑफिस प्रणालीमुळे कोणती फाइल कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, तिच्यावर आतापर्यंत काय कार्यवाही झाली आणि निर्णय कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे. आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद, दस्तऐवजांचे जतन आणि डिजिटल स्वाक्षरीद्वारे मंजुरी देण्याची सुविधाही मिळणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजात उत्तरदायित्व निश्चित करण्यास मदत होईल.
प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केंद्रीकृत हेल्पडेस्क उभााणार
तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीकृत हेल्पडेस्क उभारण्यात येणार असून, विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाईल. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रियाही करण्यात आली आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे महापालिकेच्या कामकाजाचा वेग वाढविणे, कागदाचा वापर कमी करणे आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणे शक्य होणार असल्याचे आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Numerology: नवीन व्यवसाय किंवा नोकरी बदलण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या मूलांकानुसार कोणती तारीख ठरेल भाग्याची!

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Manipur Violence: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन; काय आहे कारण?

State Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेकडून कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस; किमान ५७ हजार रुपये, तर कमाल पाच लाख ३६ हजारांची दिवाळी भेट

SCROLL FOR NEXT