मुंबई

पात्र मतदारांची नावे वगळू नका!

CD

पात्र मतदारांची नावे वगळू नका!
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली एस. चोकलिंगम यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेतील अत्यंत जाचक प्रक्रियेमुळे लाखो पात्र मतदारांची नावे वगळली जात आहेत. या प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि अनियमितता आहे. त्यात सुधारणा कराव्यात व एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी,’ अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. १९) मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी मंत्री अस्लम शेख, नसीम खान, आमदार अमिन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, चरणसिंग सप्रा, राजेश शर्मा, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, वीरेंद्र चौधरी, ट्युलिप मेरिंडा, मंदार पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘एसआयआर प्रक्रियेदरम्यान नमुना क्रमांक ६, ७ आणि ८ संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत असून, बूथ लेव्हल ऑफिसर्स योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सत्ताधारी पक्षाला फायदा होईल, अशा पद्धतीने काही ‘बीएलए’ जाणीवपूर्वक ठराविक मतदारांची नावे वगळत आहेत. आम्ही या गैरप्रकाराचे काही पुरावे दिले, त्यावेळी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन चोकलिंगम यांनी दिले आहे.’ फॉर्म ६, ७ आणि ८ बद्दल नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत, त्या दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. ‘जे बीएलए सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीने विशिष्ट मतदारांची नावे वगळत आहेत, त्यांच्याविरोधात निवडणूक आयोग कठोर कारवाई करेल. निवडणूक आयोग एक नोटीफिकेशनही जारी करणार आहे,’ असे आश्वासन एस. चोकलिंगम यांनी दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, त्याचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव सुरक्षित राहिले पाहिजे.
- वर्षा गायकवाड, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT