मुंबई

वायुप्रदूषणाप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला दंड

CD

वायुप्रदूषणप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : वायुप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने ओशिवरा परिसरात सुरू असलेल्या डी. जी. एस. लँड डेव्हलपर (इंडिया) प्रा. लि. यांच्या बांधकामाला स्थगिती देण्याची नोटीस बजावली आहे. बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव, रस्ते आणि पदपथांवर बांधकाम साहित्याचा साठा तसेच धूळ शोषण यंत्रणेची अनुपलब्धता अशा आठ त्रुटी आढळल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्याने बांधकाम व्यावसायिकाला ३५ हजार रुपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४-अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ओशिवरा गावातील सीटीएस क्रमांक १/८, अपना घर संकुलाजवळ, मुख्य रस्ता आणि पहिल्या क्रॉस रोडच्या जंक्शनवरील बांधकामस्थळी ही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या के-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाने १९ ऑक्टोबर रोजी ही नोटीस जारी केली. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. नोटिसीनुसार, बांधकामस्थळी लावलेले ताडपत्री, हिरवे कापड आणि ज्यूटचे आच्छादन निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नव्हते, माती, बांधकाम साहित्य आणि मलबा झाकून ठेवण्यात आलेला नव्हता, काही साहित्य रस्ते आणि पदपथांवर ठेवण्यात आले होते. धूळ शोषण यंत्रणा उपलब्ध नसणे किंवा ती कार्यरत नसणे, तसेच कापणे, घासणे आणि ड्रिलिंगची कामे आच्छादनाशिवाय करणे, या त्रुटीही निदर्शनास आल्या, याशिवाय, काँक्रीट मिश्रणाच्या कामावेळी हिरव्या कापडाचे आच्छादन नसणे, प्लास्टरसाठी साहित्य मिसळण्याची जागा बंदिस्त नसणे आणि वाहनांचे टायर धुण्याची सुविधा नसणे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, बांधकाम तातडीने थांबविण्याचे निर्देश देतानाच, ओशिवरा पोलिसांनाही बांधकामस्थळी लक्ष ठेवून काम करणाऱ्या व्यक्तींना हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT