मुंबई

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी एस. एल. रोड बंद

CD

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी एस. एल. रोड बंद
मुंबई, ता. २० : मुलुंड पश्चिमेतील नानेपाडा नाल्यावरील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने एस. एल. रोडवरील (सेवाराम लालवाणी रोड) वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गोशाळा रोड ते व्ही. पी. रोड यांना जोडणाऱ्या या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ३१ मे २०२७ पर्यंत बंद राहणार असून, वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नानेपाडा नाल्यावरील सध्याचा पूल जीर्ण झाला आहे. पुलालगतच्या पदपथाचा भाग तसेच दोन्ही बाजूंचे कठडेही कमकुवत झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कामासाठी एस. एल. रोडवरील गोशाळा रोड ते व्ही. पी. रोडदरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
गोशाळा रोडवरून व्ही. पी. रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जे. एन. रोड येथे डावे वळण घेऊन पुढे जाता येईल तसेच व्ही. पी. रोडवरून गोशाळा रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी जे. एन. रोड येथे उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही वाहतूक व्यवस्था २० ऑक्टोबर २०२६ ते ३१ मे २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

शिवा शर्मा हत्याकांड: लखनऊमधून फरार झालेली श्रद्धा दुबे नागपुरात सापडली; बहीण अन् चालकही अटकेत, ११ दिवस पोलिसांना गुंगारा

Team India : जसप्रीत बुमराहने २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळू नये! कुणी दिलाय हा सल्ला?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ठाकरेंच्या मेळाव्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावरून शेकडो शिवसैनिक रवाना; राजन विचारे व केदार दिघे यांच्या उपस्थितीने वेधले लक्ष.

‘हा सोनू, हा मोनू’; संताच्या मांडीवर डोकं ठेवून बिस्किटं खातात दोन अस्वल, VIDEO पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT