पश्चिम रेल्वेची भंगारविक्री ३२० कोटींवर
पश्चिम रेल्वेचे ५०० कोटींच्या महसुलाचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २० : पश्चिम रेल्वेने ‘मिशन झीरो स्क्रॅप’ उपक्रमांतर्गत भंगारविक्रीतून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे ३२० कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत भंगारविक्रीचे २४८.९७ कोटी रुपयांचे निर्धारित उद्दिष्ट ओलांडत रेल्वेने २८ टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात भंगारविक्रीतून ५०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवण्याचे पश्चिम रेल्वेचे लक्ष्य आहे.ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यानही पश्चिम रेल्वेने भंगारविक्रीत चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण महिन्यासाठी ५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते, मात्र १६ ऑक्टोबरपूर्वीच रेल्वेने हे उद्दिष्ट ओलांडले आहे.
भंगारविक्रीतून महसूल
रेल्वेच्या विविध विभागांमध्ये पडून असलेल्या निरुपयोगी साहित्याची वेळेत विल्हेवाट लावून महसूल मिळवणे, हा ‘मिशन झीरो स्क्रॅप’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जुने रेल्वे रूळ, रेल्वे मार्गाशी संबंधित साहित्य, वापरातून बाद केलेली इंजिने, डबे, मालवाहू वाघिणी, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि अन्य भंगार साहित्याचा समावेश आहे.
स्वच्छतेसह कार्यक्षमतेवर भर
रेल्वेच्या विविध आस्थापनांमध्ये भंगारमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भंगाराची वेळेत विल्हेवाट लावल्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यासोबतच उपलब्ध जागेचा योग्य वापर करता येतो. तसेच, साहित्याचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.