मुंबई

कुर्ल्यातील आगीत नऊ जण जखमी

CD

कुर्ल्यातील आगीत नऊ जण जखमी
‘राजावाडी’त दाखल; प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर एचडीआयएल इमारतीत आज सकाळी आग लागून धुरामुळे आठ जणांना श्वसनाचा त्रास झाला, तर एका व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या नऊ जणांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर शाळेजवळ असलेल्या कोहिनूर एचडीआयएल इमारत क्रमांक पाचमध्ये सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. तळमजला अधिक १२ मजले असलेल्या या इमारतीतील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा असलेल्या डक्टमधील उपकरणे आणि विविध मजल्यांवरील लोखंडी दरवाजांपर्यंत आग मर्यादित होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी आग पूर्णपणे विझविण्यात आली.
आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास झालेल्यांमध्ये ईशान अहमद (वय ३०), मोहम्मद शेख (५), फरिना बोनो (२७ ), एजास अहमद (६५), फरिन शेख (१८), नैदया शेख (१४), कलिमा सहा (४५) आणि अलिना शेख (१७) यांचा समावेश आहे. जाहेद अली शेख (५५) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या सर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT