मुंबई

मुख्यमंत्र्यांना पाठवणार ‘खारा फराळ’!

CD

मुख्यमंत्र्यांना पाठवणार ‘खारा फराळ’!

एसटीचा निधी रोखल्याने नाराजी; ३ नोव्हेंबरची मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आवश्यक निधी ३ नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून सरकारच्या अर्थ विभागाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी दिला. कर्मचाऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणीत जात असल्याने ४ नोव्हेंबरला हे आंदोलन करण्यात येणार आहे.

एसटीने सवलतींच्या प्रतिपूर्तीची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी अतिरिक्त निधी आणि कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीची रक्कम देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. निधी मागितल्यानंतर अर्थ विभागाकडून वारंवार अडथळे आणले जात असल्याचा आरोप बरगे यांनी केला. कर्मचाऱ्यांची दिवाळी खारट करणाऱ्या सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांसह अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना खारा फराळ पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मागणीपेक्षा कमी निधी
एसटीने सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि थकीत देणी भागविण्यासाठी सरकारकडे १,०१५ कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र सरकारने केवळ ३८०.०६ कोटी रुपये दिले. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे बरगे यांनी सांगितले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांतील ५,७४० कोटी रुपयांहून अधिक देणी थकीत असल्याचा दावा बरगे यांनी केला.

मंजूर रक्कमही मिळाली नाही
कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता आणि वेतनवाढीच्या फरकाची रक्कमही थकीत आहे. अलीकडील वेतनवाढीच्या फरकापोटी सरकारने ५३८.८३ कोटी रुपये मंजूर केले असले, तरी ही रक्कम एसटीला अद्याप मिळालेली नाही, असे बरगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

Velhe News : किल्ले राजगडवर 'मर्दानी दसरा' संपन्न; राजगडावर शेकडो दुर्ग सेवकांची उपस्थिती

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदेंची सहा तास चौकशी

Ausa Crime : औसा हादरले! मदत केल्याच्या कारणावरून भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT