ध्वनिप्रदूषणासह लेझरचा उच्छाद
देवीच्या विसर्जन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : देवीच्या विसर्जन मिरवणुकीत फटाके, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि लेझर दिव्यांचा बेसुमार वापर करण्यात आल्याचे आवाज फाउंडेशनने केलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे. मुंबईतील विविध ठिकाणी मंगळवारी (ता. २०) विसर्जन मिरवणुकीवेळी आवाजाची पातळी ११०.८ डेसिबलपर्यंत पोहोचली. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक आणि फटाके फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली असतानाही, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आवाज फाउंडेशनच्या नोंदीनुसार, माहीम येथे रात्री ८.५१ वाजता आवाजाची पातळी ९४.४ ते ११०.८ डेसिबल होती. या ठिकाणी ध्वनिक्षेपकांसह लेझरचाही वापर करण्यात आला. दादर पश्चिम येथे रात्री ९.१६ वाजता आवाजाची पातळी ८२ ते १०२.६ डेसिबल होती. त्यानंतर परिसरात फटाक्यांमुळे धुराचे लोट पसरल्याचेही फाउंडेशनने नमूद केले आहे. प्रभादेवी येथे रात्री ९.२१ वाजता आवाजाची पातळी ८८ ते १०३.१ डेसिबल, कफ परेड येथे रात्री ९.५३ ते ९.५५ या वेळेत आवाजाची पातळी ८७.२ ते १००.४ डेसिबल होती. मुंबई उच्च न्यायालयाने यंदा सर्व सणांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी आवाजाची पातळी मोजून योग्य ती कारवाई करावी, असेही आदेशात नमूद आहे; परंतु त्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे आवाज फाउंडेशनच्या निरीक्षणात दिसले. आता उर्वरित सणांच्या काळात उच्च न्यायालयाच्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुमैरा अब्दुलअली यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.