पालिका कर्मचाऱ्यांना
३३ हजारांचा बोनस?
दोन दिवसांत निर्णय अपेक्षित
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त ३३ हजार रुपयांचा बोनस देण्याबाबत भाजप आग्रही आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात दोन हजार रुपयांची वाढ करून कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये देण्याच्या प्रस्तावावर भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आज महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची बैठक झाली. पुढील दोन दिवसांत बोनसबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेवर २५ वर्षांत प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या माध्यमातून दिलासा देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक बोनस मिळावा, यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते; मात्र बोनसची अंतिम रक्कम निश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांशी चर्चा केली जाणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ३१ हजार बोनस दिला होता. यंदा त्यात दोन हजारांची वाढ करून ३३ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ सुमारे ९३ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. बोनसची रक्कम वाढविल्यास महापालिकेच्या खर्चातही वाढ होणार आहे. तरीही कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी बोनसवाढीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.