... तर विभाग नियंत्रक जबाबदार
एसटीच्या अस्वच्छ प्रसाधनगृहांबाबत मंत्री सरनाईक यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : एसटी बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जी झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते. “सर्वसामान्य प्रवाशांकडून आपण दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारतो. प्रवासीही ही रक्कम देण्यास हरकत घेत नाहीत, मात्र त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या या रास्त अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा थेट परिणाम एसटीच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई होता कामा नये,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांना दिलासा द्या
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बस स्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलता दाखवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.