मुंबई

मुंबईतील नऊ हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

CD

नऊ हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
डॉमिनोज पिझ्झासह नामांकित खाद्य आस्थापनांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींमधील अस्वच्छता, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील नऊ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये डॉमिनोज पिझ्झासह नामांकित रेस्टॉरंट्स आणि बेकरींचा समावेश आहे. अस्वच्छ स्वयंपाकघर, गंजलेली भांडी, परत आलेला पाव ताज्या पावात मिसळणे, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा विविध त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत. दरम्यान, राज्यभरातील कारवाईत ५४ लाख ६६ हजार रुपये किमतीचा सुमारे ३८ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने २१ आणि २२ ऑक्टोबरला मुंबईतील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी केली. यात माझगाव येथील एस. के. बेकरी, ग्रँट रोड येथील नेकझाद रेस्टॉरंट, वांद्रे पश्चिम येथील फुडीज मल्टी कुझिन, जोगेश्वरी पश्चिम येथील अरेबियन लुकमा, कुर्ला पश्चिम येथील दिल्ली जायका, घाटकोपर पश्चिम येथील आर सिटी मॉलमधील यू मी, गोवंडी-चेंबूर येथील बिक्कगाने बिर्याणी आणि भांडुप पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा या आस्थापनांचा परवाने निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत कुर्ला येथील दिल्ली जायका याचा दोनदा उल्लेख असून, एकूण नऊ परवाने निलंबित केल्याचे नमूद केले आहे.
तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये स्वयंपाकघर आणि सांडपाणी निचरा व्यवस्थेत अस्वच्छता, गंजलेली भांडी व साहित्य, तापमानाच्या अपुऱ्या नोंदी, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, तसेच मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर अशा गंभीर त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नवी मुंबईत साठा जप्त
दरम्यान, नवी मुंबईतील नेरूळ येथील टीटीसी औद्योगिक परिसरातील आरडीसी ॲग्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवरही एफडीएने मोठी कारवाई केली. या ठिकाणाहून ३३ हजार २८६ किलो राजमा आणि कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजित किंमत ५० लाख चार हजार ५८० रुपये आहे. यामध्ये १० हजार ९९८ किलो लहान राजमा आणि २२ हजार २८८ किलो बुलेट पल्सेस ब्रँडच्या राजम्याचा समावेश आहे. हा साठा निकृष्ट दर्जाचा आणि चुकीचे लेबलिंग केलेला असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
राज्यभरात ११ आस्थापनांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेत मुंबईतील नऊ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन अशा एकूण ११ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यभरात ३७ हजार ९९१.४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ५४ लाख ६६ हजार २८५ रुपये आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकारांबाबत नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर अथवा प्रशासनाच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Dengue Infection : डेंगीने आठ वर्षांच्या मुलीचा बळी; उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

SCROLL FOR NEXT