मुंबई

प्रवाशांच्या सूचनांतून रेल्वे सेवा सुधारणार! मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ‘रेल जनसंवाद’मध्ये प्रवाशांनी मांडल्या अपेक्षा; सुविधा सुधारण्यावर भर

CD

प्रवाशांच्या सूचनांतून सेवा सुधारणार!
मध्य-पश्चिम रेल्वेच्या ‘रेल जनसंवाद’मध्ये सुविधा सुधारण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : लोकलचा वेग, गर्दीचे नियोजन, एसी लोकलचे भाडे असो वा स्थानकांवरील मूलभूत सुविधा, मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासाशी निगडित प्रश्न आणि अपेक्षा गुरुवारी ‘रेल जनसंवाद’च्या माध्यमातून थेट रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचल्या. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, तर पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या कार्यक्रमात केंद्राच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला-वर्मा यांनीही सहभाग घेतला. महिलांसाठी लोकलमध्ये अधिक डबे उपलब्ध करणे, एसी लोकलचे भाडे कमी करणे, दिव्यांगांसाठी राखीव डब्यांतील अनधिकृत प्रवासाला आळा घालणे आणि स्थानकांवर थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढविणे, अशा सूचना प्रवाशांनी केल्या. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना गर्दीतून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले.

मेल-एक्स्प्रेस सेवांबाबत अपेक्षा
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करावेत, स्लीपर डब्यांची संख्या वाढवावी आणि सणासुदीच्या काळात आरक्षित तिकिटांची उपलब्धता सुधारावी, अशी मागणी करण्यात आली. पश्चिम उपनगरांतील प्रवाशांच्या सोयीसाठी विरार-सीएसएमटी उपनगरी सेवा सुरू करण्याची सूचनाही मांडण्यात आली.

सूचनांवर कार्यवाहीचे आश्वासन
मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांनी मध्य रेल्वेवर दररोज १,८२० उपनगरी लोकल फेऱ्या चालविण्यात येत असल्याची माहिती दिली. अलार्म चेन ओढण्याच्या घटना आणि अन्य परिचालनविषयक कारणांमुळे अडथळे येत असले, तरी गाड्यांचे वेळापत्रक पाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पश्चिम रेल्वेच्या कार्यक्रमाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह उपस्थित होते.

रेल्वेतील सुधारणांचे कौतुक
रेल्वेतील स्वच्छता, प्रवासी सुविधा, हेल्पलाइन आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याचे प्रवाशांनी कौतुक केले. अधिक अभिप्राय मिळविण्यासाठी अर्जांचे वितरण करण्यात आले. प्रवाशांच्या सूचना अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन श्रेणींमध्ये विभागून त्यांचा आढावा घेतला जाणार आहे.

कार्यक्रमात निवेदिता शुक्ला-वर्मा यांनी प्रवाशांच्या सहभागाचे कौतुक करून युवकांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी मध्य रेल्वे सांस्कृतिक संघाने ‘बदलती रेल्वे, नव्या भारताची ओळख’ या विषयावर पथनाट्य सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT