मुंबई

पश्चिम रेल्वेच्या पाण्याची ‘शुद्धतेची परीक्षा’ उत्तीर्ण! १८ हजार ६१० नमुन्यांची तपासणी; सर्व चाचण्यांत १०० टक्के यश

CD

पश्चिम रेल्वेच्या पाण्याची ‘शुद्धतेची परीक्षा’ उत्तीर्ण!
१८ हजार ६१० नमुन्यांची तपासणी; सर्व चाचण्यांत १०० टक्के यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील आणि रेल्वे वसाहतींमधील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. १ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान तपासलेल्या १८ हजार ६१० नमुन्यांमध्ये सर्व नमुने पात्र ठरले. पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण आणि जिवाणूंची उपस्थिती तपासणाऱ्या दोन्ही चाचण्यांत १०० टक्के यश मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात क्लोरीन मिसळले जाते. पाणी शुद्ध केल्यानंतरही त्यात काही प्रमाणात क्लोरीन शिल्लक राहते. हे प्रमाण योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी १५ हजार ९३६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या सर्व नमुन्यांच्या चाचण्या पात्र ठरल्या.

जिवाणूंच्या चाचण्याही यशस्वी
पाण्यात हानिकारक जिवाणू आहेत का, हे तपासण्यासाठी दोन हजार ६७४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या सर्व नमुन्यांचे निष्कर्षही समाधानकारक असल्याचे रेल्वेने सांगितले. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी अशा तपासण्या महत्त्वाच्या आहेत.

स्थानकांसह रेल्वे वसाहतींवरही लक्ष
पश्चिम रेल्वेकडून स्थानकांबरोबरच रेल्वे वसाहतींमधील पाण्याच्या गुणवत्तेचीही नियमित तपासणी केली जाते. प्रवाशांसह रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी पाण्याचे नमुने गोळा करणे, प्रयोगशाळेत त्यांची तपासणी करणे आणि पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे यापुढेही सुरू राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT