मुंबई

मंद वाऱ्यांमुळे प्रदूषणाचा विळखा!

CD

मंद वाऱ्यांमुळे प्रदूषणाचा विळखा!
उपाययोजनांसाठी पालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत; मात्र सध्या हवेचा वेग मंदावल्याने वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि धूळ जमिनीलगतच साचून राहत आहे. त्यामुळे मुंबईत प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकामांच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासह नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईची भौगोलिक परिस्थिती, समुद्राकडून वाहणारे वारे आणि हवेचा मंदावलेल्या वेगाचा शहरातील प्रदूषणावर परिणाम होत असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. हवेचा वेग कमी झाल्यामुळे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि रस्त्यांवरील धूळ वातावरणात पसरून दूर जाण्याऐवजी जमिनीलगत साचून राहते. त्यामुळे धुरकट वातावरण दिसते. समुद्राकडून मुंबईच्या दिशेने खारे वारे वाहतात, तेव्हाही हवेतील आर्द्रता आणि प्रदूषण वाढते; मात्र हवेचा वेग वाढल्यास प्रदूषणाच्या पातळीत बदल दिसू शकतो, असे त्यांनी सांगितले.
----
बेकऱ्यांनी स्वच्छ इंधन वापरावे!
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅन अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सहकार्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचाही प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. शहरातील बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी सीएनजी, पीएनजी किंवा विजेसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
---
बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा
बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसविणे आणि त्याद्वारे प्रदूषणाच्या पातळीवर देखरेख ठेवण्यावरही भर दिला जात आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी विशेष वाहनांच्या माध्यमातून पाण्याची फवारणी केली जात आहे. हवेत पाण्याचे तुषार सोडून धूलिकण खाली बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार काम थांबविण्याच्या नोटिसा देण्यासह दंडात्मक कारवाईही केली जात असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
---
‘समीर’ ॲपचा वापर करा!
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेच्या माहितीसाठी खासगी ॲपवरील आकडेवारीवर अवलंबून न राहता, केंद्र सरकारच्या ‘समीर’ ॲपचा वापर करावा. विविध स्रोतांवरील आकडेवारीत फरक असू शकतो, असे डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT