पादचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी
बेस्ट बसचालकावर गुन्हा
मुंबई, ता. २२ : मजास डेपो परिसरात चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा मागील दरवाजा बेस्टच्या बसला आदळून पुन्हा टेम्पोतील कामगाराला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फरीद अहमद शेख (वय ५३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बेस्ट बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २१) सकाळी मजास येथील पीएमजी कॉलनी परिसरात हा अपघात झाला. बेस्टची बस मजास डेपो येथून अंधेरीच्या दिशेने जात होती. त्याच वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो उभा होता. टेम्पोमधून कोंबड्या उतरवून जवळच्या दुकानात नेण्याचे काम फरीद शेख करीत होते.
बस टेम्पोच्या बाजूने जात असताना टेम्पोचा मागील दरवाजा अचानक उघडण्यात आला. हा दरवाजा बसच्या डाव्या बाजूच्या मागील कोपऱ्याला आदळला आणि परत फिरून कोंबड्या उतरविणाऱ्या फरीद शेख यांना लागला. त्यामुळे ते खाली पडून जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) तपासणी होणार असल्याने ती मजास डेपोमध्ये उभी करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.