मुंबईतील धुळीच्या प्रदूषणामुळे महापौर संतप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : वाढते वायुप्रदूषण, बांधकामांमधून पसरणारी धूळ, रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्प आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवरून महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २३) नगरसेवकांनी प्रशासनाला लक्ष्य केले. शहरातील आरएमसी प्लांट मुंबईबाहेर स्थलांतरित करा, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले. दरम्यान, हे आरएमसी प्लांट मुंबईबाहेर गेल्यास घराच्या किमतीत वाढ होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सभागृहात दिली. प्रशासनाच्या उत्तराने महापौरांनी असमाधान व्यक्त करीत प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लक्ष वेधले. पेडणेकर यांनी सांगितले, की वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात प्रदूषणाचा मुख्य हॉटस्पॉट बनला आहे. या पंचतारांकित भागातील हवेची गुणवत्ता माझगाव, चेंबूर, कुर्ला, अंधेरी या चार दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये दिल्लीपेक्षाही वाईट झाली आहे. फक्त बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच नाही, तर मुंबईत राहणारे नागरिक धूळ आणि विषारी वायूच्या विळख्यात पुरते अडकले आहेत. रस्त्यांवर पाण्याचा शिडकाव करणे आणि धूळ शोषक यंत्रे वापरणे हे केवळ व्हीआयपीसाठी आहे का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर किशोरी पेडणेकर यांनी निवेदन सादर केले. प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
आठ हजार पत्रे प्राप्त
मुंबईकरांकडून सुमारे आठ हजार पत्रे प्राप्त झाली असून, त्यापैकी जवळपास ५० टक्के पत्रे अनधिकृत बांधकामे आणि धुळीच्या साम्राज्याबाबत आहेत. मुंबईत सध्या सुमारे साडेतीन हजार बांधकामे सुरू आहेत. प्रत्येक नागरिकाला चांगले घर मिळण्याबरोबरच आरोग्यही सुरक्षित राहणे आवश्यक आहे, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या.
भायखळ्यातील घास गल्ली परिसरात निकृष्ट सिमेंट आणि बांधकामांमुळे त्रास होतो. त्यामुळे मुंबईतील आरएमसी प्लांटमधून धूळ पसरत असून, असे प्लांट मुंबईबाहेर हलविण्याचे निर्देश रितू तावडे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.