ठाणे-बोरिवली बोगद्याचा म्हाडाला फटका
भरपाईसाठीच्या स्मरणपत्रांनंतरही ‘एमएमआरडीए’चे दुर्लेक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : ठाणे-बोरिवलीदरम्यानचा प्रवास सुसाट व्हावा, म्हणून ‘एमएमआरडीए’तर्फे उभारल्या जात असलेल्या दुहेरी बोगद्यासाठी एमएमआरडीने म्हाडाची ठाणे-चितळसर येथील सुमारे ६,१९८ चौरस मीटरचा भूखंड घेतला आहे. त्याबदल्यात भरपाई म्हणून ३५ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी म्हाडाने वर्षभरापूर्वी एमएमआरडीएकडे केली आहे, मात्र म्हाडाला अद्याप काही मिळाले नाही तसेच म्हाडाने दिलेल्या स्मरणपत्राला साधे उत्तर दिले नसल्याची खंत म्हाडाच्या अधिकारी व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहरालगत असलेल्या मानपाडा चितळसर येथे म्हाडाचा सुमारे ५३ हजार चौरस मीटरचा भूखंड आहे. खासगी विकसकाच्या माध्यमातून भागीदारी तत्त्वावर म्हाडाने येथे घरे बांधली आहेत, मात्र या भूखंडातील सुमारे सहा हजार १९८ चौरस मीटरचा भूखंड ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी आणि रस्त्यासाठी गेला आहे. त्यामुळे विकसकाला मिळणारा भूखंड कमी झाल्याने त्याने म्हाडाला देय असलेल्या एकूण घरांपैकी १२३ घरे कमी करून केवळ १,०५० घरे म्हाडाच्या ताब्यात दिली आहेत. त्यामुळे म्हाडाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने या भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला ३५ कोटी रुपये देण्याची मागणी ‘एमएमआरडीए’कडे केली होती, मात्र त्याला एमएमआरडीएने सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने दोन वेळा स्मरणपत्र पाठवले आहे.
इतर भूखंडाची मागणी
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ठाणे, कल्याण, वसई-विरार, पालघर परिसरातील घरांना मोठी मागणी आहे, मात्र सध्या कोकण मंडळाकडे नव्याने गृहप्रकल्प राबवण्यासाठी भूखंडच उपलब्ध नाहीत, त्यातच एमएमआरडीए सहा हजार चौरस मीटरच्या भूखंडाच्या बदल्यात रक्कम किंवा भूखंड देणार नसेल, तर घरे बांधायची कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
म्हाडाने एमएमआरडीएला चितळसर येथील दिलेल्या भूखंडापोटी आम्हाला अद्याप कोणतीच भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे भूखंडाच्या किमती किंवा भूखंडाच्या बदल्यात भूखंड मिळावा, म्हणून आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- डाॅ. विशाल राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.