मुंबई

ब्लॅक स्पॉटवर सुरक्षा उपाय

CD

ब्लॅक स्पॉटवर सुरक्षा उपाय
२२ कोटींच्या कामांचा प्रस्ताव; दुभाजक, वाहतूक बेटांची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहर व उपनगरांतील एकूण ४८ अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट्स) ठिकाणी रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजना राबवण्यासाठी तब्बल २२ कोटी सात लाख ७१ हजार ४०८ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी स्थायी समिती आणि स्थापत्य समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
​मुंबईत वाढती वाहनसंख्या आणि घनतेमुळे प्रमुख रस्ते, जंक्शन्स, उड्डाणपूलांचे उतार आणि सागरी किनारा मार्ग तसेच जोडमार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत प्राप्त झालेल्या अहवालानुसार मुंबईत एकूण ४८ ‘ब्लॅक स्पॉट्स’ (उच्च जोखमीचे चौक) निश्चित करण्यात आले आहेत. या धोकादायक स्थळांवर अपघात रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक कामे हाती घेतली जाणार आहेत.
​या कामांमध्ये प्रामुख्याने , ​रस्त्यांवर थर्मोप्लॅस्टिक रोड मार्किंग (रंगकाम) करणे,​ मध्य विभाजक पुरवणे व बसवणे, ​आवश्यकतेनुसार वाहतूक सूचना व दिशादर्शक फलक उभारणे, ​द्विमार्गी पेव्हमेंट मार्कर्स (रिफ्लेक्टर) बसवणे, ​वाहतूक बेटे बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
​या कामांसाठी महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने ई-निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदारांचे प्रस्ताव प्राप्त झाले, ज्यामध्ये मे. प्रगती एन्टरप्रायजेस या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ३६ टक्के कमी असा सर्वात कमी दर सादर केला. वस्तू व सेवाकर (जीएसटी) वगळून कंत्राटदाराने नमूद केलेल्या दराच्या आधारावर, सादिलवार व पाणी/मलनिस्सारण आकारणीसह एकूण १८ कोटी २४ लाख ६९ हजार ५४४ रुपये इतका प्रत्यक्ष कंत्राट खर्च निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्याचा काळ वगळून हे संपूर्ण काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारावर राहणार आहे.
​सदर कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी स्थापत्य समिती (शहर) आणि स्थापत्य समिती (उपनगरे) यांच्याकडे तसेच कंत्राट करारास मंजुरी मिळण्यासाठी स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव प्रक्रियेनुसार ठेवण्यात आला असून, यामुळे आगामी काळात मुंबईतील रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.

या कामांचा समावेश :
- ​रस्त्यांवर थर्मोप्लॅस्टिक रोड मार्किंग (रंगकाम) करणे.
- ​दुभाजके पुरवणे व बसवणे.
- ​आवश्यकतेनुसार वाहतूक सूचना व दिशादर्शक फलक उभारणे.
- रिफ्लेक्टर बसवणे.
- ​वाहतूक बेटे बांधणे.

महापालिका ब्लॅक स्पॉटवर सुधारणा करते आहे, हा निर्णय स्वागताचा आहे, मात्र हे करत असताना झालेले अपघात, त्यांची कारणे, अपघात प्रणव स्थळे यांचा अभ्यास करून संपूर्ण डेटा सादर करणे गरजेचे आहे. तरच महापालिकेच्या उपायोजना प्रभावी ठरतात का, हे तपासता येईल.
- अशोक दातार, वाहतूकतज्‍ज्ञ

अपघातप्रवण क्षेत्रे कोणती?
- अमर महल जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन, शीव सर्कल जंक्शन, किंग्ज सर्कल जंक्शन माटुंगा, साकीनाका जंक्शन अंधेरी पूर्व, हाजी अली जंक्शन, मिठ चौकी मालाड, बिंदू माधव ठाकरे जंक्शन वरळी, माहीम जंक्शन, छेडा नगर जंक्शन घाटकोपर, टिळक नगर जंक्शन, कांजूरमार्ग पूर्व जंक्शन, कलानगर चौक वांद्रे पूर्व, जवाहरलाल नेहरू मार्ग सांताक्रूझ पूर्व, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड जंक्शन, प्रियदर्शिनी ट्रॅफिक चौक शीव-चेंबूर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड जंक्शन, आकुर्ली मार्ग जंक्शन कांदिवली पूर्व, गोरेगाव-मुलुंड मार्ग जंक्शन, एन. एस. फडके मार्ग जंक्शन अंधेरी पूर्व, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जंक्शन, एलबीएस मार्ग जंक्शन कुर्ला पश्चिम, शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द मार्ग जंक्शन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंक्शन बोरिवली पूर्व, स्वामी विवेकानंद मार्ग दहिसर पूर्व, घाटकोपर-अंधेरी मार्ग आणि एलबीएस मार्ग जंक्शन, वांद्रे-शीव लिंक रोड, बीकेसी मुख्य मार्ग जंक्शन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT