मुंबई

देवनारच्या कचऱ्यावर पोकलेनचा उतारा

CD

देवनारच्या कचऱ्यावर पोकलेनचा उतारा
वर्षभरासाठी ७.७२ कोटींची तरतूद; स्थायी समितीसमोर प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : देवनार क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे, कचरा टाकण्यासाठी नवीन जागा तयार करणे आणि उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या घातक वायूमुळे कचऱ्याला लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी महापालिकेने पोकलेन यंत्रे भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षभराच्या कालावधीत एकूण ४,३८० पाळ्यांसाठी पोकलेन यंत्रे भाड्याने घेण्यासाठी पालिका तब्बल सात कोटी ७२ लाख २४ हजार ३०५ रुपये खर्च करणार आहे. या कामाचे कंत्राट ‘मे. अंशुमन ॲण्ड कंपनी’ या सर्वात कमी दर देणाऱ्या निविदाकाराला देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या आगामी बैठकीत सादर करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या देखरेख समितीच्या मार्गदर्शनाखाली २०१६ पासून कचरा सपाटीकरण आणि नाले सफाईसाठी मोठ्या क्षमतेच्या पोकलेन यंत्रांचा वापर केला जात आहे. विद्यमान कंत्राटाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्यामुळे तातडीची सेवा म्हणून नवीन ई-निविदा मागविल्या होत्या. छाननीनंतर तीन कंपन्या पात्र ठरल्या. त्यामध्ये ‘मे. अंशुमन ॲण्ड कंपनी’ यांनी प्रति पाळी १२ तास १६,९५३ रुपये इतका सर्वात कमी दर सादर केला. हा दर पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा ०.५९ टक्क्यांनी कमी असल्याने ७.७२ कोटींचे कंत्राट या कंपनीला देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. १८५ लाख टन साचलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जमीन पूर्ववत करण्याच्या कामाचे कंत्राट ‘मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी’ला देण्यात आले आहे.

आगी लागण्याच्या घटना
ऑक्टोबर ते मे या कालावधीत देवनारमध्ये आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडल्‍या. यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने कचरा हलवून त्यावर पाणी शिंपडले जाते. यासाठी दररोज १२ पोकलेन यंत्रे दोन पाळ्यांमध्ये ७ दिवस व ५ रात्र कार्यरत ठेवणे आवश्यक असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Supreme Court SIR hearing: ''विरोधकांच्या याचिका केवळ एका बातमीवर आधारलेल्या'', SIR प्रकरणी निवडणूक आयोगाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

Maharashtra Live News: शेतकऱ्यांनी उसावर फिरवला नांगर

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

SCROLL FOR NEXT