निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत शासनाचे कार्यवाहीचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनातील विलंब, अपुऱ्या निवास सुविधा, सुरक्षेचा प्रश्न आणि प्रशिक्षणातील असमानता यासह विविध समस्यांवर वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
सेंट्रल मार्डने मांडलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. २०२५-२६ च्या तुकडीतील काही निवासी डॉक्टरांचे पाच महिन्यांचे विद्यावेतन थकीत असल्याचा मुद्दा मार्डने उपस्थित केला. विद्यावेतन वेळेवर मिळावे, त्यासाठी निश्चित तारीख ठरवावी आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर संचालनालयाने संबंधित संस्थांना सूचना द्याव्यात आणि मागील तीन महिन्यांतील विद्यावेतन वितरणाची माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनातील तफावत, महागाई भत्ता आणि नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील मानधनाचे प्रश्नही मांडण्यात आले.
...
जे. जे.तील निवासाचा प्रश्न गंभीर
सर जे. जे. समूह रुग्णालयातील एक हजारांहून अधिक निवासी डॉक्टरांच्या तुलनेत सुमारे ३५० डॉक्टरांनाच सध्या निवासाची सुविधा उपलब्ध असल्याचे मार्डने निदर्शनास आणले. त्यावर संबंधित अधिष्ठात्यांनी निवासी डॉक्टरांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.