मुंबई

दोन मिनिटांत कळणार औषधांची गुणवत्ता

CD

दोन मिनिटांत कळणार औषधांची गुणवत्ता
राज्यात आठ यंत्रे कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आधुनिक औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या एका मशीनची किंमत एक कोटी २० लाख रुपये एवढी असून, एकूण आठ यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत.
या यंत्रांच्या मदतीने अवघ्या दीड ते दोन मिनिटांत औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी करता येणार आहे. औषधांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा गुणवत्तेबाबत संशय आढळल्यास संबंधित औषध कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने आठ विभागांमध्ये आठ भरारी पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक पथकात दोन सदस्य असतील. ही पथके संबंधित विभागातील रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याला अचानक भेटी देऊन औषधांचे नमुने तपासतील. औषधांच्या गुणवत्तेत अनियमितता आढळल्यास संबंधित औषध कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. औषध तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, अशा प्रकारची यंत्रणा देशात प्रथमच राबविण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला.
...
डॉक्टरांची भरती
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टरांची भरतीही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १,४०० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे ६०० विशेषज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात आणखी १,९०० डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT