मुंबई

‘जीएसटी’पोटी महापालिकेला १,२९४ कोटी

CD

‘जीएसटी’पोटी महापालिकेला १,२९४ कोटी
मुंबई, ता. २७ : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द झाल्यामुळे मुंबई महापालिकेला होणाऱ्या महसुली नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारतर्फे ऑक्टोबरमध्ये एक हजार २९४ कोटी तीन लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी १ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिकेच्या खात्यात जमा झाला असून, याबाबतची माहिती प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केली. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला. या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महापालिकेला निधी दिला जातो. त्यानुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर महिन्याची नुकसानभरपाईची रक्कम महापालिकेला प्राप्त झाली आहे. महापालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) यांनी यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर माहितीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावात १ ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या १,२९४ कोटी तीन लाख रुपयांच्या महसुलाचा तपशील नमूद करण्यात आला आहे. जीएसटी नुकसानभरपाई हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असल्याने या निधीच्या माध्यमातून विविध नागरी सेवा आणि विकासकामांसाठी आर्थिक नियोजन करण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT