मुंबई

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मिळणार चालना

CD

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मिळणार चालना
जमीन हस्तांतरणावरील २५ टक्के शुल्क माफ करण्याचा सरकारचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राज्याच्या विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पर्यावरणपूर्वक सौर, पवन, उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी खरेदी केलेल्या जमिनीचे समूह कंपनी किंवा विशेष हेतू कंपनीकडे अंतर्गत हस्तांतरण करताना आकारले जाणारे २५ टक्के हस्तांतरण शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २७) राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
राज्यात १९९४ पासून कुळवहिवाट कायद्यातील तरतुदीनुसार औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदीस परवानगी आहे. या तरतुदीनुसार औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेली जमीन विकल्यास हस्तांतरणकर्त्याला चालू वार्षिक मूल्यदर तक्त्यानुसार बाजारमुल्याच्या २५ टक्के रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते, सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रात मूळ कंपनी जमीन खरेदी करते आणि नंतर बँक कर्ज किंवा परदेशी गुंतवणुकीसाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र हेतू कंपनी तयार करून जमीन त्या ‘एसपीव्ही’कडे हस्तांतरित करते, हा केवळ कागदोपत्री बदल असून, मालकी तीच राहते. तरीही २५ टक्के शुल्क आकारल्याने कंपन्यांवर आर्थिक बोजा पडून प्रकल्प खर्च वाढत होता, त्याची दखल घेत राज्य सरकारने केवळ नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांपुरती ही सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT