मुंबई

लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!

CD

लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या
कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!
रेल्वे प्रशासनाकडून दखल; व्हिडिओद्वारे तपास सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मध्य रेल्वेची लोकल सेवा सोमवारी नऊ तासांहून अधिक काळ विस्कळित झाल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. त्यातच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलचे दरवाजे बंद ठेवत, प्रवाशांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार ठाणे स्थानकात घडला. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित व्हिडिओची पडताळणी करून संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर कल्याणला जाणारी कर्मचारी विशेष लोकल आली. तिच्या एका डब्याचे दरवाजे आतून बंद असल्याने प्रवाशांनी विनवणी करूनही तो उघडण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून निषेध व्यक्त केला. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. कर्मचारी विशेष लोकलमध्ये मोजकेच कर्मचारी होते. काही कर्मचारी तर आसनांवर झोपल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
--
व्हिडिओच्या आधारे शोध सुरू
परळ येथून सायंकाळी ४च्या सुमारास कल्याणला जाणाऱ्या कर्मचारी विशेष लोकलमधील हा प्रकार आहे. संबंधित व्हिडिओची पडताळणी करून दरवाजे बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT