मुंबई

२७० बांधकामांना नोटिसा

CD

२७० बांधकामांना नोटिसा
२९ बांधकामस्थळांचे काम बंद


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२७ : महापालिकेने बांधकामस्थळांना प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २७० कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, तर नियमांचे पालन करण्यासाठी मुदत देऊनही आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या २९ बांधकामस्थळांना काम बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. बांधकामस्थळांवरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे धोरण पालिकेने अवलंबले आहे.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बांधकामस्थळांची तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळलेल्या विकसकांना प्रथम कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. नियमांचे पालन करण्यासाठी संबंधितांना एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती, मात्र मुदत देऊनही आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या २९ बांधकामस्थळांना काम बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम सुरू ठेवता येणार नाही. पालिकेच्या तपासणीत बांधकामस्थळांवर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये धूळ उडू नये यासाठी नियमित पाण्याची फवारणी न करणे, बांधकाम परिसराभोवती आवश्यक बॅरिकेड्स न लावणे, हवा गुणवत्ता मोजण्यासाठी सेन्सर बसवलेले नसणे आणि बांधकाम स्थळ जाळी किंवा शीटने पूर्णपणे झाकलेले नसणे, अशा त्रुटींचा समावेश आहे. या उपाययोजना न केल्यामुळे बांधकामांमधून धूळ हवेत पसरून प्रदूषणात भर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

२२७ पथके तैनात
बांधकामस्थळांवर प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने २२७ पथके तैनात केली आहेत. या पथकांमध्ये महापालिका, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके मुंबईतील विविध प्रशासकीय विभागांमध्ये बांधकामस्थळांची तपासणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

अवघ्या १० मिनिटांचं अंतर तरीही आईवडिलांपासून दूर राहते वैदेही परशुरामी; कारण सांगत म्हणाली- अनेक नातेवाईकांनी त्यांना...

SCROLL FOR NEXT