मुंबई

शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिकांचा मुंबईकरांना अनुभव कुलाब्यात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लष्कराचे भव्य प्रदर्शन; विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण

CD

शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिकांचा मुंबईकरांना अनुभव
कुलाब्यात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लष्कराचे भव्य प्रदर्शन; विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : आधुनिक शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिके, लष्करी बँड आणि युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके अशा विविध आकर्षणांनी सजलेले भारतीय लष्कराचे भव्य प्रदर्शन उद्यापासून (ता. २९) मुंबईकरांसाठी खुले होणार आहे. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथील गॅरिसन बटालियनच्या पीटी मैदानावर २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘नो युवर आर्मी’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांना प्रदर्शनाला भेट देता येईल. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सर्व नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येईल. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथील गॅरिसन बटालियनच्या पीटी मैदानावर आरसी चर्च बसथांब्याजवळ हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांना प्रदर्शन पाहता येईल.
या प्रदर्शनात भारतीय लष्कराची आधुनिक शस्त्रास्त्रे आणि विविध उपकरणे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर ड्रोनची प्रात्यक्षिके, लष्करी बँडचे सादरीकरण, तायक्वांदो, संगिनी युद्धकौशल्य, खुकरिनृत्य, चेंदू मेलम आणि मल्लखांबाचे सादरीकरण होणार आहे. लष्करातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्यासह प्रेरणादायी चित्रफिती पाहण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.

महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र दालन
प्रदर्शनात महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. लष्करी शाळा, राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी) आणि सैनिक स्कूल यांसारख्या संस्थांमधील प्रवेश व शैक्षणिक संधींबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच स्मृतिचिन्हे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल, छायाचित्रांसाठी विशेष जागा आणि विविध उपक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना लष्करी जीवनाची ओळख
तरुणांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशसेवेची भावना रुजवणे हा प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. शिस्त, नेतृत्व, धैर्य आणि निःस्वार्थ सेवा या लष्करी मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे. देशाच्या सीमांपासून दूर राहणाऱ्या मुंबईकरांना सैनिकांचे कार्य आणि विविध आव्हानात्मक परिस्थितींमध्ये ते बजावत असलेल्या कर्तव्याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी; आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून खासदार सुनील तटकरेंपासून जीवाला धोका असल्याचा दावा!

SCROLL FOR NEXT