आंदोलनात सहभागी झाल्याने साम्या कोरडेला नोटीस
मुंबई, ता. २८ : मुंबईतील विविध आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल पुरोगामी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा साम्या कोरडेला विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस उपआयुक्त (मध्य परिमंडळ-२) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीत साम्या यांच्यावर ५०,०००च्या सद्वर्तणूक बंधपत्राची अट घालण्यात आली आहे.
या नोटिशीमध्ये ‘हम भारत के लोग’च्या बॅनरखाली तुषार गांधींसारख्या प्रमुख चेहऱ्यांसह शांततापूर्ण निदर्शनांमध्ये सहभाग, नीट परीक्षेतील अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे आणि संस्थात्मक उत्तरदायित्वाची मागणी करणे यांचा समावेश आहे. याबाबत साम्या कोरडे म्हणाली की ‘ही नोटीस विद्यार्थी कार्यकर्त्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कायद्यांचा वापर करण्याच्या देशभरातील एका सुनियोजित पॅटर्नचा भाग आहे. निवडणुकीतील अनियमिततेविरुद्ध विरोध दर्शवल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी नेत्या नेहा बोरा आणि सीजेपी कार्यकर्ते अभिजित दीपके यांना बीएनएसएस प्रतिबंधात्मक कारवाई आणि शांतता बंधपत्र नोटिशीद्वारे लक्ष्य केले. मुंबई पोलिसांनी कलम १२६ बीएनएसएस अंतर्गत मला ५०,००० रुपयांच्या बंधपत्राची मागणी करणारी नोटीस बजावली आहे. तोच एक पॅटर्न वापरला जात असल्याचे पाहत आहोत.’ न्याय, पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्यापासून आम्हाला रोखता येणार नाही. मी कायदेशीर चौकटीत आणि विहित प्रक्रियेद्वारे माझ्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेन, असेही साम्याने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.