मुंबई

सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे

CD

सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे
महापरिनिर्वाण दिनासाठी विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आणि स्मारकांच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रोनचा वापर करावा. तसेच वाहतुकीतील बदलांची माहिती नागरिकांना आगाऊ देऊन आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना बनसोडे यांनी केल्या. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी. अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडाव्यात आणि ६ डिसेंबरला मेगाब्लॉक टाळण्याबाबत रेल्वे प्रशासनाने विचार करावा. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त बससेवेचे नियोजन करावे, अशी विनंती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाने ५ व ६ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. ६ डिसेंबरला राज्यात ‘ड्राय डे’ घोषित करण्याबाबत तसेच सार्वजनिक सुट्टीसंदर्भातील परिपत्रक आगाऊ प्रसिद्ध करण्याबाबतही संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे सुचविण्यात आले.
...
विचारांचा प्रसार करावा!
सामाजिक न्याय विभागाने वृत्तपत्रांमधून विशेष जाहिराती प्रसिद्ध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करावा. शिवाजी पार्क परिसरात पुस्तकांचे स्टॉल उभारून विभागाच्या विविध योजनांची माहिती अनुयायांपर्यंत पोहोचवावी, असेही निर्देश देण्यात आले.
...
निधी मंजूर करा!
महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आवश्यक ठरू शकतो. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने आवश्यक निधीची तरतूद आणि प्रशासकीय मंजुरीसंदर्भातील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले. या बैठकीस गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, चैत्यभूमी समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT