एकाच रुग्णावर प्रथमच दुसऱ्यांदा यकृत प्रत्यारोपण
जितिन पुन्हा कामावर रुजू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी यकृत प्रत्यारोपण झालेल्या जितिन शिर्के (वय ३०) याच्यावर तब्बल १९ वर्षांनंतर दुसरे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. ५ जुलैला झालेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, जितिनची प्रकृती सुधारत आहे. तो पुन्हा कामावर रुजू झाला आहे.
विशेष म्हणजे २००७ मध्ये त्याच्या वडिलांनी यकृताचा काही भाग दान करून त्याचा जीव वाचवला होता, तर यंदा आईने यकृताचा उजवा भाग दान केला. बालपणी जितिनला ऑटोइम्यून सिरोसिसचे निदान झाले होते. डिसेंबर २००७ मध्ये मुंबईतील एका रुग्णालयात डॉ. एस. के. माथूर यांनी त्याच्यावर पहिले प्रत्यारोपण केले होते. त्यानंतर त्याने शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमित रक्ततपासणीत यकृताच्या कार्यात गंभीर बिघाड झाल्याचे आढळले. त्याने डॉ. आभा नागराल यांचा सल्ला घेतला. वैद्यकीय तपासणी आणि उपचारांच्या पर्यायांचा विचार केल्यानंतर दुसऱ्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. आईचे यकृत दानासाठी योग्य ठरल्यानंतर ५ जुलैला शस्त्रक्रिया करण्यात आली. जितिन यांच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच हे संकट आले. मात्र, त्यांच्या होणाऱ्या पत्नीने त्यांना साथ दिली. आता अवयवदानाबाबत जनजागृती करून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचा त्यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.