मुंबई

रुग्णांच्या आहाराबाबत नगरसेवक संतप्त

CD

रुग्णांच्या आहाराबाबत नगरसेवक संतप्त
विविध तक्रारींसह कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आहारात खरोखरच बासमती तांदूळ दिला जातो का, त्याची गुणवत्ता कोण तपासते आणि निविदेतील दरानुसारच खाद्यपदार्थ पुरविले जातात का, असे सवाल नगरसेवकांनी उपस्थित केले आहेत. रुग्णांना पातळ डाळ मिळते, अंडी दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी ठेकेदारांच्या स्वयंपाकघरांची तपासणी, अचानक पाहणी आणि निकृष्ट आहार पुरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या रुग्णालयांतील आहाराच्या कंत्राटासंदर्भातील स्थायी समितीतील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या नगरसेविका अजंठा यादव यांनी बासमती तांदळाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. दर्जेदार वस्तूंचे दर गृहीत धरले जात असताना प्रत्यक्षात त्याच दर्जाच्या वस्तू रुग्णांना मिळतात का, याची तपासणी कोण करणार, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनीही रुग्णांना बासमती तांदूळ दिला जातो का आणि त्यासाठीचे दर कसे निश्चित केले, याची माहिती मागितली. दीपमाला बढे यांनीही जेवणात फक्त बासमती तांदूळ वापरणार, तर मग सर्व पदार्थ फक्त बासमतीचेच वापरणार का, असा प्रश्न उपस्थित केला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी रुग्णांच्या तक्रारींचा दाखला देत डाळ पातळ असते, अंडी मिळत नाहीत, अशा तक्रारींकडे लक्ष वेधले. महापालिका पूर्वी स्वतः आहार पुरवत असताना होणारा खर्च आणि सध्याच्या कंत्राटातील खर्च यांची तुलना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी यांनी तीन वर्षांत ५५ लाख रुग्णांना जेवण पुरविण्याच्या नियोजनाचा उल्लेख करत प्रतिरुग्ण १६ रुपयांच्या खर्चात दर्जेदार आहार कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. जेवणाचे नमुने तपासावेत आणि अचानक भेटी देऊन गुणवत्ता पडताळावी, अशी मागणी त्यांनी केली. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी खाद्यपदार्थांचे प्रमाण, खर्च आणि दर निश्चितीचे निकष स्पष्ट करण्याची मागणी केली. भाजपच्या प्रीती सातम आणि राजेश्री शिरवाडकर यांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या मीनाक्षी पाटणकर यांनी दंडाची तरतूद करण्याची, तर यशोधन फणसे यांनी आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण याबाबत खुलासा करण्याची मागणी केली.
...
प्रशासनाचे उत्तर
अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या दरांच्या आधारे वार्षिक सरासरी काढून निविदेचे दर निश्चित केल्याचे सांगितले. आहाराच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी अधिष्ठाता आणि आहारतज्ज्ञांची समिती असून, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT