पालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार बोनस
महापौराचे निर्देश; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज महापौर रितू तावडे यांनी जाहीर केला. हे सानुग्रह अनुदान कामगारांच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे, तसे निर्देश महापौराने दिले आहेत. सुमारे एक लाख पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात पालिका मुख्यालयात महापौर दालनात महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे गटनेते आज बैठक झाली. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त यंदा २० टक्के म्हणजेच सरासरी ५० हजार रुपये सानुगृह अनुदान देण्याची मागणी पालिकेतील कामगार संघटनांनी केली होती. गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार रुपये वाढीव सानुग्रह अनुदान देण्यास महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय झाला.
दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी वाढती महागाई लक्षात घेता किमान ५० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. कामगार संघटना आणि प्रशासनातील तिढा न सुटल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा तिढा सोडवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महापौर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३३ हजार रुपये निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता, दिवाळी सानुग्रह अनुदान कोणत्याही कामगार संघटनांशी अथवा गटनेत्यांशी चर्चा न करता एकतर्फीपणे परस्पर जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सदर प्रक्रियेस महापौर यांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला होता.
...
या मान्यवरांची उपस्थिती
बैठकीत प्रशासनाकडून महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, उपायुक्त (सा.प्र.) किशोर गांधी, उपायुक्त (वित्त) देविदास क्षीरसागर आणि समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, हेमंत कदम, अशोक जाधव, वामन कविस्कर, रमाकांत बने, शशांक राव, प्रशांत तळेकर, प्रकाश जाधव, संजय कापसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.