मुंबई

जैववैद्यकीय कचऱ्याची नोंदणी बंधनकारक

CD

जैववैद्यकीय कचऱ्याची नोंदणी बंधनकारक
माहिती अद्ययावत करण्याचे आरोग्य संस्थांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महाराष्ट्रातील रुग्णालये, क्लिनिक, प्रयोगशाळा आणि इतर आरोग्य संस्थांना जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आता ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यासाठी मोबाइल ॲप आणि वेब पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल २८ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार आहे.
रुग्णालयांमधून निर्माण होणाऱ्या संसर्गजन्य कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट सुनिश्चित करणे आणि संबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एमपीसीबीच्या माहितीनुसार, राज्यातील ८६ हजारांहून अधिक आरोग्य संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, सर्वेक्षणातून वगळल्या गेलेल्या तसेच नव्याने सुरू झालेल्या संस्थांची माहिती मिळवण्यासाठी स्व-नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात २७ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वीच यादीत समाविष्ट असलेल्या संस्थांनाही पोर्टलवर लॉगीन करून आपल्या नोंदणीतील माहिती तपासावी लागणार आहे. माहितीमध्ये काही बदल असल्यास ती १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. हा नियम रुग्णालये, दवाखाने, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा, रक्तपेढ्या, पशुवैद्यकीय केंद्रे, संशोधन संस्था तसेच जैववैद्यकीय कचरा निर्माण करणाऱ्या किंवा त्याची विल्हेवाट लावणाऱ्या इतर संस्थांनाही लागू होणार आहे. संस्थांकडून नोंदणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतरच एमपीसीबीकडून मंजुरी दिली जाणार आहे.
...
माहितीही होणार उपलब्ध
नवीन प्रणालीमुळे रुग्णालयांना जैववैद्यकीय कचऱ्यासाठी बारकोड तयार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कचरा जमा झाल्यानंतर तो संकलित करणाऱ्या सामायिक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राला त्याबाबत सूचना मिळेल. तसेच कचरा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनाची माहितीही संबंधित रुग्णालयाला आधीच उपलब्ध होऊ शकेल.
...
येथे साधा संपर्क
ऑनलाइन नोंदणी किंवा माहिती अद्ययावत करताना अडचणी येणाऱ्या आरोग्य संस्थांना पुढील ई-मेल पत्त्यांवर संपर्क साधता येईल. ibwg.support@mpcb.gov.in आणि mpcbbmwsurvey@innowaveit.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT